|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मलप्रभा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करा

मलप्रभा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करा 

बेळगाव / प्रतिनिधी

मलप्रभा साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राज्य रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 168 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे. शेतकऱयांना एफआरपीप्रमाणे अजूनही ऊस बिले मिळाली नाहीत. तेव्हा साखर कारखान्याकडून ऊस बिले वसूल करून द्यावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली.

एम. के. हुबळी साखर कारखान्यात 2004 ते 2016 पर्यंत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आमदार डी. बी. इनामदार आणि त्यांच्या संचालक मंडळाने हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात साखर कारखाना कार्यस्थळासमोर 24 एप्रिलपासून धरणे आंदोलन छेडणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही बँका व सोसायटय़ांकडून शेतकऱयांचे ट्रक्टर जप्त करण्यात येत आहेत. ती जप्ती थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नायक, अशोक यमकनमर्डी, भरमू केमापुरे, बसवराज सिद्दम्मन्नवर, बसवराज हंपीहोळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

Related posts: