|Sunday, August 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे निधन

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या 84वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. किशोरी आमोणकर यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार होणार आहेत.

किशोरीताईंचा जन्म मुंबईत 10 एप्रिल 1932 मध्ये झाला आई व प्रख्यात गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायनकलेच्या समृद्ध वारसा मिळाला होता. वडील माधवदास भडिया यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. ख्यल गायकीबरोबरच ठुमरी, भजन गायनात त्यांनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे पती रव अमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या. किशोरीताई येंना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 1987मध्ये पद्मभूषण व 2002मध्ये पद्मविभूषळ या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

 

Related posts: