|Saturday, February 16, 2019
You are here: Home » leadingnews » आरबीआय छापणार 200 रूपयांच्या नव्या नोटा?

आरबीआय छापणार 200 रूपयांच्या नव्या नोटा? 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांत अलेल्या वृत्तानुसाल रिझर्व्ह बँक या वर्षी जूननंतर या नोटा जारी करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

सरकारकडून एकदा अधिकृतरित्या मंजुरी मिळाल्यानंतर 200 रूपयांच्या छपाई जूननंतर सुरू केली जाउ शकते, असा दावा ‘लाइव्ह मिंट’ ने केला आहे. काही इतर वेबसाईट्सनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आरबीआयने देशातील 5 भागात 10 रूपयांची प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू केली आहे. ही या चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर नोटाही प्लास्टिक चलनाच्या माध्यमातून सादर केल्या जाऊ शकतात.

Related posts: