|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » कर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांची आत्महत्या

कर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / सातारा :

कर्जबाजारीमुळे साताऱयातील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केली. ही घटना साताऱयातील वडगाव हवेलीमध्ये घडली. दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विजय चव्हाण आाणि जगन्नाथ चव्हाण या दोघा भावांनी आत्महत्या केली. विजय चव्हाण यांनी दुकानात तर जगन्नाथ चव्हाण यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. या दोघा भावांनी 60 लाखांचे कर्ज काढले होते. त्याच्या परतफेडीसाठी तगादा लावला जात होता. मात्र, त्यांना परतफेडीसाठी अडचणी येत होत्या. यातच त्यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व ताणामुळे या दोघा भावांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

Related posts: