|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ : शरद पवार

आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ : शरद पवार 

ऑनलाईन टीम / पनवेल :

भाजप सरकारने निवडणुकांपूर्वी शेतकऱयांना कर्जमाफीची आश्वासने दिली होती, मात्र अद्यापही सरकारने शेतकऱयांची कर्जे माफ केली नाहीत, दिलेली आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर केली.

पनवेल येथे संघर्ष यात्रेच्या सांगताप्रसंगी पवार बोलत होते. पवारांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकार शरसंधान साधले. ते म्हणाले, भाजपने निवडणुकांपूर्वी कर्जमाफी करु असा शब्द दिला होता. मात्र, जेव्हा भाजप सत्तेत आला तेव्हा दिलेला शब्द पाळला नाही. पंतप्रधानांनीही असाच शब्द दिला होता. मात्र, त्यांनी तो शब्द पाळला नाही. भाजपचे सरकार आल्यावर दिलेला शब्द तंतोतंत पाळला असता तर असा संघर्ष करावा लागला नसता. दिलेला शब्द पाळायचा ही सरकारची इच्छा नाही. त्यामुळे शेतकरी आपला इंगा नक्कीच दाखवतील, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, यापुढे संघर्ष आणखीन तीव्र करु, आम्ही ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, असा इशाराही पवारांनी राज्यकर्त्यांना दिला.