|Monday, June 17, 2019
You are here: Home » Automobiles » दुचाकी वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ

दुचाकी वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बजाज ऑटोशिवाय जास्तीत जास्त दुचाकी वाहन निर्माता कंपन्यांसाठी मागील आर्थिक वर्षात लाभाचा गेला आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. हिरो मोटरकॉर्प आणि टी. व्ही. एस. दुचाकी निर्माता कंपनीने विक्रीचा सर्व रेकॉर्ड तोडला आहे.

होंडाने मागील वर्षी 31 मार्चला संपणाऱया आर्थिक वर्षामध्ये 12 टक्क्यांने वाढून 50 लाख वाहनांची विक्रीचा आकडा पार केला असून, एकूण 50, 08, 103 वाहनांची विक्री करत नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे. या पूर्वीच्या आर्थिक वर्षांमध्ये हा आकडा 44, 83, 462 इतका होता. हिरो मोटोकॉर्पच्या 66, 63, 903 वाहनांची विक्री करण्यात आली असून, मागील वर्षी 66, 32, 322 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. कंपनीने मार्च 2016 मध्ये एकूण 6, 09, 951 वाहनांची विक्री करण्यात आली आहे.