|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केजरीवाल यांचे ‘बिल’ कोणी भरायचे ?

केजरीवाल यांचे ‘बिल’ कोणी भरायचे ? 

भाजप-आप वाद चिघळला, जेठमलानी विनामूल्य खटला चालविणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला सुरू आहे. त्यांच्या न्यायालयीन खर्चाचे 3 कोटी 40 लाख रूपयांचे बिल कोणी द्यावे यावरून भाजप आणि आपमध्ये वाद भडकला आहे. आपच्या म्हणण्यानुसार केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असल्याने हा खर्च दिल्ली सरकारने सोसला पाहिजे. तर भाजपच्या म्हणण्यानुसार ही केजरीवालांची खासगी लढाई असून तो खर्च त्यांच्या खिशातूनच त्यांना करावा लागेल.

मंगळवारी हा वाद चांगलाच चिघळला. केजरीवाल यांनी हे बिल सरकारजमा केल्याने भाजप संतप्त झाला आहे. मुख्यमंत्री राज्य सरकारची लूट करीत आहेत, असा आरोप भाजपने केला. आता केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनीही या वादात उडी घेऊन त्याला वेगळी कलाटणी दिली आहे. केजरीवाल हे ‘गरीब’ पक्षकार असल्याने त्यांचा खटला विनामूल्य चालवू अशी घोषणा त्यांनी केल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

केजरीवाल यांच्या विरोधातील खटला सध्या कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे. आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारी त्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे खटल्याचे कामकाज सुरू राहणार आहे. केजरीवाल यांनी पुरावा सादर न केल्यास ते जेटली यांची बनदामी केल्याबद्दल अडचणीत येऊ शकतात.

Related posts: