|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » मुर्तझाची टी-20 मधून निवृत्ती

मुर्तझाची टी-20 मधून निवृत्ती 

वृत्तसंस्था / कोलंबो

बांगलादेशचा गोलंदाज मश्रफी मुर्तझाने टी-20 या क्रिकेटच्या प्रकारातून आपली निवृत्तीची घोषणा केली. बांगलादेशचा संघ सध्या लंकेच्या दौऱयावर असून उभय संघात टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेनंतर मुर्तझा टी-20 प्रकरातून निवृत्त होणार आहे.

बांगलादेशतर्फे टी-20 प्रकारात सर्वाधिक म्हणजे 52 सामने खेळणारा एम. मुर्तझा हा पहिला क्रिकेटपटू आहे. 26 सामन्यात त्याने बांगलादेशचे नेतृत्व केले असून त्यापैकी 9 सामने जिंकले आहेत. मंगळवारचा लंकेविरूद्धचा मुर्तझाचा 53 वा सामना आहे. त्याने टी-20 प्रकारात 37.56 धावांच्या सरासरीने 39 बळी घेतले आहेत. 2012 साली आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात मुर्तझाने 4 बळी घेतले होते. टी-20 प्रकारात मुर्तझा हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने 37 डावात 23 षटकार मारले आहेत.

Related posts: