|Friday, November 16, 2018
You are here: Home » क्रिडा » भुतियाच्या करारामध्ये वाढ

भुतियाच्या करारामध्ये वाढ 

वृत्तसंस्था / कोलकाता

भारताचा अव्वल फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार बायचुंग भुतियाबरोबर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने सल्लागार म्हणून एक वर्षाचा करार केला होता. भुतियाच्या या कराराची मुदत गेल्या नोव्हेंबरमध्ये संपली होती. दरम्यान अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भुतियाच्या करारामध्ये आणखी एका वर्षांसाठी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष सुब्रता दत्ता यांनी दिली.

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने आपल्या तांत्रिक समितीमधूनही यापूर्वी भुतियाला वगळले होते. त्याच्या जागी शाम थापा याची गेल्या मार्चमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. 2015 च्या ऑक्टोबरमध्ये अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी भुतियाची फेडरेशनच्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती.

Related posts: