|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपाचा पावसाळापूर्व नालेसफाईचा मुहर्त कधी ?

मनपाचा पावसाळापूर्व नालेसफाईचा मुहर्त कधी ? 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिकेने पावसाळयापूर्वची नालेसफाई अध्याप सुरू केलेली नाही. पावसाळा दोन महिन्यावर आला असून ही सफाईची मोहिम सुरू नसल्याने ऐन पावसाळयाच्या तोंडावर सफाईसाठी धावाधाव होणार आहे. दरम्यान मनपाला नालेसफाईसाठीची यंत्रणा तयार असल्याचे सांगण्यात आले.

सांगली शहरात डेनेजची चांगली नसल्याने प्रत्येक पावसाळयात मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचुन राहते. यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. शहरातील मारूती चौक, शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई, स्टेशन रोड, आदी शहराच्या मुख्य भागातील प्रमुख रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा डोहच साचत असतो, पाण्याचा निचारा लवकर होत नसल्याने हे पाणी पाऊस पडल्यानंतर तास दोन तास थांबून राहते. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होते, वाहतुक खोळंबते. याशिवाय शहराच्या उपनगरामध्येही गटारीची सुविधा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचुन राहते.

डेनेजचा प्रश्न असला तरी या पाण्याच्या निचऱयासाठी आहे त्या गटारी पावसाळयापूर्वी साफ करणे महत्वाचे आहे. गटारी साफ केल्यातरच या प्रमुख चौकात साचुन राहणाऱय़ा पाण्याचा निचरा वेगाने होणार आहे. सध्या एप्रिल महिना सुरू झाला असुन मे अखेरीस किंवा जुनच्या पहिल्या आठवडयापासुन शहरात पाऊसाला सुरूवात हेते. त्यामुळे पावसाळयाला सध्या दीड-पावणेदोन महिनेच शिल्लक राहिले आहेत. असे असताना मनपाने पावसाळापूर्वच्या नालेसफाईला अध्याप सुरूवात केलेली नाही. प्रत्येक वर्षी मनपाच्या या हलगर्जीपणामुळे पावसाळयात नागिरीकांना त्रास सहन करावे लागत आहे. अवधी असताना नालेसफाई केली जात नाही. या नालेसफाईवर लाखो रूपये खर्ची टाकतात मात्र कामे झाल्याचे दिसून येत नाही.

ऐन पावसाच्या तोंडावर नालेसफाईसाठी धावाधाव सुरू होते. मग हे काम निट होत नाही. त्यामुळे नालेसफाई करूनही पाण्याचा निचरा होत नाही आणि नागिरीकांना त्रास सहन करावा लागतो. गेल्या महिन्यात आयुक्तांनी नालेसफाई तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले मात्र अध्याप या सफाईच्या कामाला महुर्त मिळालेला दिसत नाही. नालेसफाईसाठी मनपाला अत्याधुनिक मशिनरीही आल्याचे सांगण्यात आले मात्र सफाईची कामे मात्र कोठे सुरू असल्याचे दिसून येत नाही. माधवनगर वरील बायपास येथून पश्चिमेकडून पूर्वेकडे भोबे गटार जाते, मोठीच्या मोठी असलेल्या या गटारतुन निम्या शहराचे पाणी जाते, या गटारीच्या सफाईचे कामही अध्याप सुरू झाले नाही.

 शहरातील शंभर फुटी रोडवरही मोठी गटार आहे ही गटार सध्या दहा बारा फुट खोल असूनही कचरा, गाळांनी अर्धी भरली आहे याचीही  सफाई केली नाही. या गटारीतील कचरा पाईमध्ये अडकून गेल्या पंधरवडयात शहरातील पत्रकार नगर व अन्य भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दहा बारा दिवस या भागात पाण्यासाठी धावाधाव करावी लागली टँकरही सु रू करावे लागले होते. पाईप चोकपही लवकर सापडत नव्हते शेवटी मशिनच्या सहाय्याने हे चोकअप शोधुन काढले. प्रत्येक पावसाळयात शहरातील प्रमुख मार्गावर व चौकात पाण्याचे डोहच्या डोह साचतात, हे कशामुळे पाणी साचते हे मनपाला वर्षानुवर्षे कळत नाही. पावसाळयात नदी भरली कि बॅक वॉटर मारूती चौकात येते, हे पाणी कशामुळे येते याचाही मनपा अधिकाऱयांना शोध लागला नाही. आता कुठे याचा शोध लागल्याने कामाचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले.