|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बापट गल्लीतील ट्रान्स्फॉर्मरने घेतला पेट

बापट गल्लीतील ट्रान्स्फॉर्मरने घेतला पेट 

प्रतिनिधी/ बेळगाव

 बापट गल्ली कार पार्किंग येथील ट्रान्स्फॉर्मरने सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास पेट घेतल्याने गोंधळ उडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी अग्निशमन कार्यालयाला संपर्क साधला. तत्पूर्वी हेस्कॉम कर्मचाऱयांनी तत्परता दाखवून नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

सोमवार असल्याने बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लग्न सराईचे दिवस असल्याने परगावाच्या वाहनांची बापट गल्ली कार पार्किंगमध्ये गर्दी झाली होती. त्यातच सायंकाळी शेजारीच असणाऱया ट्रान्स्फॉर्मरने पेट घेतला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. नागरिकांनी प्रसंगावधान राखत अग्निशमन कार्यालयाला संपर्क साधला. तोवर हेस्कॉम कर्मचाऱयांच्या मदतीने नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली.

हा ट्रान्स्फॉर्मर मुख्य बाजारपेठेत असल्याने ही आग भडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु नागरिकांनी आग आटोक्यात आणले. यामुळे वाहन चालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.