|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेकायदा मुरुमप्रकरणी लाक्षणिक उपोषण

बेकायदा मुरुमप्रकरणी लाक्षणिक उपोषण 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी शहर व उपनगरांची तहान भागविणाऱया जवाहर तलावातील मुरुम बेकायदा उपसा केला जात होता. याविषयी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्याकडे लक्ष दिले गेले नाही. फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. यामागाचे गौडबंगाल काय? नैसर्गिक संपत्तीची लूट करणारे कोण? कारवाई न करण्यामागचे नेमके कारण काय? याची उत्तरे मिळविण्यासाठी सचिन लोकरे यांनी आता एकदिवशीय लाक्षणिक उपोषण व आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 10 रोजी होणाऱया उपोषणाच्या परवानगीसाठी धावपळ चालविली आहे.

जवाहर तलाव परिसरात पालिकेच्या मालकीच्या जागेतील मुरुम बेकायदा उपसा करून वाहतूक होत असल्याचा प्रकार 13 मार्च रोजी उघडकीस आला. यावेळी  लोकरे यांनी पालिका अधिकाऱयांचे लक्ष याकडे वेधले. पालिका अधिकाऱयांनही याची दखल घेत तातडीने संबंधित ठिकाणी भेट दिली. यामध्ये बेकायदा मुरुम उपसा तत्काळ थांबविला. उपसा करणाऱया जेसीबीसह वाहतूक करणाऱया वाहनांचे नंबरही टिपले. पण त्यानंतर कोणतीही कारवाई केली नाही.

कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच लोकरे यांनी याचा पाठपुरावा करत 20 मार्च रोजी निवेदन देत बेकायदा मुरुम उपसा करणाऱयांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे 23 मार्च रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करू असा इशाराही दिला. या इशाऱयाची दखल घेत आयुक्त दीपक हरदी यांनी 31 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेत घेऊ अशी ग्वाही देणारे पत्र लोकरे यांना दिले.

असे असताना 31 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेतला गेला नाही. उलट गाळाच्या नावावर मुरुमाचे बिल फाडण्यात आले. अशी तक्रार करताना संपूर्ण शहरवासियांची दिशाभूल केली गेली अशी तक्रार करताना लोकरे यांनी सभा संपताच सायंकाळी पुन्हा पालिकेला निवेदन दिले. त्यात 5 एप्रिलपूर्वी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यानंतर 3 रोजी पुन्हा निवेदन दिले. त्यात 5 एप्रिल रोजी 11 ते 5 या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्याची परवानगी लोकरे यांनी आयुक्त हरदी यांच्याकडे मागितली. परवानगीची मागणी करताच आयुक्तांनी लोकरे यांना पुन्हा पत्र देत प्रथम पोलीस प्रशासनाकडून परवानगी घ्या, असे सूचविले