|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आजपासून जिल्हा बँकेची नाबार्ड कडून तपासणी

आजपासून जिल्हा बँकेची नाबार्ड कडून तपासणी 

प्रतिनिधी/ सांगली

सांगलीसह राज्यातील 24 जिल्हा बँकात नाबार्डच्या पथकामार्फत पुन्हा तपासणी होणार आहे. नोटाबंदीनंतर पाचशे हजारच्या नोटा जमा केलेल्या तसेच नोटा बदलून घेतलेल्या 100 टक्के खातेदारांची केवायसी तपासण्यात येणार आहे. गुरूवारपासून ही तपासणी करण्यासाठी नाबार्डचे अधिकारी येणार आहेत. नाबार्डकडून ही तिसऱयांदा छाननी होणार आहे. जिल्हा बँकेतील सर्व शाखांना भेटी देवून ही तपासणी करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने दिनांक आठ नोव्हेंबरपासून रोजी मध्यरात्री पासून पाचशे व हजार रूपयांचा नोटा चलनातून रद्द केल्या दि. नऊ नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. आरबीआयच्या अधिसुचनेनुसार जिल्हा बँकेत 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत पाचशे व हजाराच्या नोटा स्विकारल्या गेल्या होत्य़ा. या चार दिवसात जिल्हा बँकेकडे 300 कोटी रूपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. जिल्हा बँकेच्या लॉकरमध्ये या नोटा अजूनही तशाच ठेवण्यात आल्या आहेत.

या नोटा आरबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये जमा होणे आवश्यक आहे. दरम्यान खातेदारांची केवायसी पुर्तता असेल तरच या नोटा जमा करून घेतल्या जातील असे आरबीआय तर्फे स्पष्ट करण्यात आला होते. केंद्र शासनातफें सर्वोच्च न्यायालयातही तसेच सांगितले होते. दरम्यान नाबार्डकडून यापुर्वी दोनदा केवायसीची तपासणी झाली आहे. मात्र शंभर टक्के खातेदारांची केली नव्हती. दुसऱया तपासणीवेळी प्रत्येक शाखेतील टॉप 50 अशा 10 हजार 850 खातेदारांची केवायसी तपासणी झाली होती. यावेळी मात्र सर्व खातेदारांची तपासणी करण्यात येणार आहे.

बँकेत 10 ते 13 नोव्हेंबर या कालवधीत एक लाख 43 हजार जणांनी पाचशे हजार रूपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. बँकेच्या 217 शाखा आहेत. आता या सर्व खातेदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नोटा बदली करून घेतलेल्या सभासदांचीही तपासणी यावेळी होणार आहे.

 

Related posts: