|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पांगुळ गल्ली-पिंपळकट्टा रुंदीकरणासाठी पाहणी

पांगुळ गल्ली-पिंपळकट्टा रुंदीकरणासाठी पाहणी 

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिकेच्यावतीने चव्हाट गल्ली ते पिंपळकट्टापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र काही अतिक्रमणे हटविण्यात आली नसल्याने रुंदीकरणाचे काम रखडले होते. पण पांगुळ गल्ली कॉर्नर ते पिंपळकट्टापर्यंतचे काम पूर्ण करण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर आणि शहर अभियंते आर. एस. नायक यांनी पाहणी केली.

मराठा मंडळ, चव्हाट गल्ली ते पिंपळकट्टापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू करण्यात आले. पण भेंडीबाजारसह विविध परिसरातील काही मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेऊन मालमत्ता हटविण्यास स्थगिती घेतली आहे. परिणामी भेंडीबाजार ते पिंपळकट्टापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे हे काम सुरू करण्याच्यादृष्टीने महापालिका आयुक्त शशीधर कुरेर व शहर अभियंते आर. एस. नायक यांनी बुधवारी सायंकाळी पाहणी केली. पांगुळ गल्ली कॉर्नर ते पिंपळकट्टापर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसात रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.