|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » रेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार रेल्वेचे तिकीट दर

रेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार रेल्वेचे तिकीट दर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय कॅबिनेटने रेल्वे विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वे विकासाठी केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. रेल्वे सेवा सुधारणा आणि रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

आरडीए आता रेल्वेचे तिकीट दर आणि मालगाडीच्या भाडय़ावर अंतिम निर्णय घेईल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही स्वतंत्र समिती असेल. रेल्वेत ही समिती असावी, अशी शिफारस अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. 2001 मध्ये राकेश मोहन समिती आणि 2014मध्ये विवेक देवराय समितीनेही या समितीची शिफारस केली होती. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही 2015-16च्या अर्थसंकल्पात या समितीचा उल्लेख केला होता. रेल्वे तिकीट दर, मालगाडीचे भांड आणि प्रवासी सुविधा याबाबतचा निर्णय आता केवळ रेल्वेमंत्रालयच घेणा नाही. आरडीएमध्ये अर्थमंत्रालय,निती आयोगासह विविध विभागाचे अधिकारी असतील, सर्वांच्याह सहमतीनंतर कोणत्याही निर्णयावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Related posts: