|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » leadingnews » एअर इंडियाच्या अधिकाऱयाची माफी मागणार नाही : गायकवाड

एअर इंडियाच्या अधिकाऱयाची माफी मागणार नाही : गायकवाड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मी एअर इंडियाच्या विमानात जागेसाठी वाद घातला नाही, माझ्यावर कर्मचाऱयाला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे, याप्रकारामुळे संसदेचा अवमान झाला असल्यास मी माफी मागतो. मात्र, मी एअर इंडियाच्या अधिकाऱयाची माफी मागणार नाही, असे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले.

खासदार गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला विमानात मारहाण केली होती. यावरुन चांगलाच वादंग निर्माण झाला होता. त्यातच आज खासदार गायकवाड हे संसदेत हजर असल्याने त्यांनी घडल्याप्रकाराबद्दल लोकसभेत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी कर्मचाऱयाला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. माझ्यावर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, माझ्यासोबत गैरवर्तन करणारे मोकाट आहेत. माझ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप कसा लावला, कोणत्याही चौकशीविना माझी मीडिया ट्रायल सुरु आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, मी जागेसाठी वाद घातला नाही. कर्मचाऱयानेच माझ्याशी गैरवर्तन केले, असे गायकवाड म्हणाले.

Related posts: