|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Automobiles » फोर्ड कंपनीने चीनमधील लग्झरी कार केल्या ‘रि-कॉल’

फोर्ड कंपनीने चीनमधील लग्झरी कार केल्या ‘रि-कॉल’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोर्डने आपल्या लग्झरी कारचे 2 मॉडेल्स असणाऱया 5,798 कार ‘रि-कॉल’ केल्या आहेत. 2016-17 या सालामध्ये आयात केलेल्या कार 30 जूनपर्यंत परत मागवल्या आहेत.

कंपनीने आपली वेबसाइटवर याबाबत माहिती पोस्ट केली आहे. याबाबत कंपनीने सांगितले, 14 जानेवारीपासून 26 ऑक्टोबर 2016 पर्यंत 5405 लिंकन एम. के. एक्स आणि 24 जूनपासून 5 डिसेंबर, 2016 पर्यंत 393 लिंकन कंटेन्टल कारच्या एअरबॅगमध्ये बिघाड झाल्याने कंपनीकडून या कार परत मागवण्यात आल्या आहेत.