|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया

अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतच भगवान रामांचा जन्म झाला आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत राम मंदिर उभारण्यापासून रोखू शकणार नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रवीण तोगडिया यांनी सांगितले.

हैदराबाद येथे आयोजित शोभा यात्रेच्या समारोपप्रसंगी तोगडिया बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर आणि देशात रामराज्य निर्माण करणे हेच आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यावेळी त्यांनी मुस्लिमांना देण्यात येत असलेल्या सवलतींवरही टीका केली. ते म्हणाले, मुघल साम्राज्याचा संस्थापक झहीरुद्दीन बाबर याचा भारताशी काहीही संबंध नसून ते मंगोलियाचे असल्याने देशात त्यांचे स्मारक उभारण्याची गरज नाही.