|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » भारताच्या पर्यटन मानांकनात सुधारणा

भारताच्या पर्यटन मानांकनात सुधारणा 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनसंबंधीच्या स्पर्धात्मक यादीमध्ये भारताचे मानांकन 12 ने सुधारले असून आता 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. हे मानांकन वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. आशियामध्ये 12 स्थानाने कामगिरी सुधारणा भारत हा एकच देश आहे. मात्र जपान आणि चीनच्या तुलनेत ही कामगिरी अद्यापही कमीच असल्याचे दिसून येते. या यादीमध्ये जपान आणि चीन अनुक्रमे चौथ्या आणि 13 व्या स्थानी आहे. युरोपातील स्पेन हा देश प्रथम स्थानी विराजमान आहे.

भारतासारख्या आकाराने विशाल असणाऱया देशात अनेक सांस्कृतिक वारसाकेंद्रे आहेत. त्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशही झालेला आहे. ई-व्हिसा आणि ऑन अराव्हयल व्हिसा देण्यात आल्याने भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले पर्यटन केंद्र अधिक खुले करण्याचा भारताकडून प्रयत्न करण्यात आला. पर्यटन आणि प्रवास क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याने भारताने चांगली मजल मारली असल्याचे म्हणण्यात आले.

गेल्या 15 वर्षात भारता येणाऱया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. 2015 मध्ये 80 लाख पर्यटकांनी भारताला भेट दिली होती. सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गित स्त्राsतांनी समृद्ध असल्याने पर्यटक भारताला भेट देणे अधिक पसंत करतात. पर्यटनास चालना देण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येत आहेत. मात्र सुरक्षेसंदर्भात अजूनही समाधानकारक प्रगती झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी हे देश यादीमध्ये पहिल्या तीन स्थानी आहेत. पहिल्या 15 देशांमध्ये 12 देश हे उभरत्या अर्थव्यवस्थेचे आहेत. जपान, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा, स्वित्झर्लंड हे पहिल्या 10 देशांमध्ये आहेत.