|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मागण्यांसाठी शेतकरी संघटना उतरली रस्त्यावर

मागण्यांसाठी शेतकरी संघटना उतरली रस्त्यावर 

सोलापूर / वार्ताहर :

    रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकयांच्या विविध मागण्यांसाठी शेलगाव(मा)येथे रास्ता रोको करण्यात आला. शेतकरी संघटनेचे युवा राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सुमारे एक तास बार्शीवरून तुळजापूर व उस्मानाबादकडे जाणारे रस्ते अडवण्यात आला होता.

   दुष्काळ आणि पिक विम्याची नुकसान भरपाई शेतकयांच्या खात्यावर थेट जमा करावी,शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला 10 लाखांची मदत तात्काळ द्यावी,उपसा सिंचन योजना पुर्वीच्या सर्व्हेनुसार खुल्या पध्दतीने पुर्ण करून तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत,स्वामीनाथन आयोग लागू करून कर्जमुक्ती द्या,शेतकयांना राजकीय आरक्षण द्या,तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकायांनी राबवलेल्या विविध योजनांची मागील 5 वर्षापासूनची चौकशी करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

    याप्रसंगी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शंकरराव  गायकवाड,तालुका अध्यक्ष हणुमंत भोसले, माढा ता.अध्यक्ष अजित परबत, विवेकानंद डोईफोडे, मुसा मुलाणी, सदानंद आगलावे, राहुल आगलावे, अमोल पाटील,समाधान लोंढे,आप्पा आगलावे,सुशांत गव्हाने, सिध्देश्वर आगलावे, अशोक आगलावे, गणेश फोपले, प्रकाश कवडे, सचिन आगलावे,बालाजी लोंढे,नेताजी लोंढे, जयराम गायकवाड, सुधिर आगलावे, जावेद शेख, अमोल झिंगे, बालाजी करडे, महेश फोपले, शिरू काळे, सुधिर लोंढे,समाधान रोडे, पंडीत मारकड, नागेंद्र बव्हनकळस, पंडीत मारकड, आनंद मारकड, सुरेश बारंगुळे, नाना सिरसट,धनाजी खांडेकर, राम माळी,दत्ता गायकवाड, रायबा मारकड,गंगाधर शिंदे, बालाजी साळूंखे,प्रविण शिंदे,सतिश शिंदे,ज्ञानदेव नलवडे,अक्षय नलवडे,चंदू नलवडे आदींसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन तहसिलचे प्रतिनिधी पानगावचे मंडळ अधिकारी जमादार बी.ए.आणि पांगरी पोलीस ठाण्याचे ए.पी.आय.ढोणे डी.एस.यांना देण्यात आले. 

 

 

Related posts: