|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » अक्षय कुमारचा नवा लूक प्रदर्शित

अक्षय कुमारचा नवा लूक प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या वर्षापासून अभिनेता अक्षय कुमार हा खऱया अर्थाने बॉलिवूडचा खिलाडी असल्याचे त्याच्या चित्रपटांच्या निवडीतून दिसून येत आहे. 2016 या वर्षी अक्षय कुमारचे बरेच चित्रपट आली मात्र त्याच्या रूस्तम चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना अधिक पसंत पडली. त्यामुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील घोषीत करण्यात आला आहे. अक्षयचा आगामी ‘रोबोट 2.0’ चित्रपटातील नवा लूक दाखवणारा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

‘रोबोट 2.0’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबत सुपरस्टार रजनीकांत सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट खऱया अर्थाने पॉवरपॅक असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू असून यंदाच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटामध्ये अक्षय डॉ. रिचर्ड या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी कधीही न पाहिलेल्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.