|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उताराच्या आधारावर वीज निर्मितीचा प्रयास!

उताराच्या आधारावर वीज निर्मितीचा प्रयास! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

खाडीच्या पाण्यावर, सोलर, वारा अशा प्रकारे ऊर्जास्त्रोतांचा वापर करत रत्नागिरीतील जाकीमिऱया-वरचीवाडी येथील विनायक बंडबे या तरूणाने वीज निर्मितीचे यशस्वी प्रयोग सिध्द करून दाखवले आहेत. आता तर त्यामध्ये आणखी एका प्रयोगाची भर त्यांनी टाकून कुठल्याही इंधनाशिवाय तसेच कुठल्याही नैसर्गिक स्त्रोताशिवाय स्लोपिंग रोड (रॅम्पच्या उतारामुळे) बंद स्थितीत पुढे सरकणाऱया व्हेईकल्सच्या सहाय्याने लाखो मेगावॅट वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग केला आहे.

विनायक बंडबे यांनी सन 2011 साली खाडीच्या पाण्यापासून वीज निर्मिती असा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर वीज निर्मिती या विषयावर 6 वेगवेगळे प्रयोग केले आहेत. ते पूर्णपणे यशस्वीही करून दाखवले आहेत. या सर्व संशोधनांच्या पेटंट रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी अर्जही सादर केलेले आहेत. तसेच पेट्रोल गाडय़ांचे ऍव्हरेज वाढवणे, गाडय़ांचे प्रदूषण कमी करणे असे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांची थर्माकोल बोटीतून समुद्र प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे.

आता तर त्यानी जर एखादी बंद गाडी उतार रस्त्यावरून (रॅम्प) असेल तर ती बंद स्थितीत पुढे सरकते. त्याचाच वापर या नव्या संशोधनात केला आहे. यातील स्लोपिंग रोड किंवा रॅम्प हे 100 ते 150 वर्षे टिकणारे असतील, असे बंडबे यांनी सांगितले. अशा पध्दतीने आपण कुठल्याही इंधनाशिवाय तसेच नैसर्गिक स्त्रोताशिवाय लाखो मेगावॅट स्वस्त, प्रदूषणमुक्त आणि मुबलक वीज निर्मितीबरोबरच लाखो लोकांना रोजगार देऊ शकणार आहोत. या संशोधनावर आधारित प्रोजेक्टचा खर्च हा प्रति मेगावॅट फक्त 35 लाख रुपये येत असून 0.25 पैसे प्रतियुनिट दराने वीज तयार होत असल्याचे सांगितले. सध्या आपल्याकडे अस्तित्वात असलेले वीज निर्मिती स्त्रोत आहेत. त्यामध्ये अणुऊर्जा, सोलर उर्जा, विंड मिल, हायड्रो पॉवर, गॅस या स्त्रोतातून वीज निर्मिती होते. या प्रकल्पांचा खर्च हा प्रति मेगावॅट रु. 4 कोटी येत असतो. त्यातून 3 ते 11 रुपये प्रति युनिट दराने वीज तयार होते. पण आपल्या देशाने अनेक वर्षे कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे तंत्रज्ञान, स्वतःची प्रगती करण्यासाठी बदल करणे आवश्यक आहे. मात्र प्रदूषण विरहित व धोका विरहित तयार केलेल्या आपल्या या नव्या वीज निर्मिती संशोधनाला आता सहकार्याची अपेक्षा गरजेचे असल्याचे विनायक बंडबे यांनी सांगितले.

Related posts: