|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » क्रिडा » आरसीबीची दिल्लीवर 15 धावांनी मात

आरसीबीची दिल्लीवर 15 धावांनी मात 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथे झालेल्या शनिवारी झालेल्या आयपीएल 10 मधील पाचव्या लढतीत रॉयल चँलेजर्स बेंगळूरने दिल्ली डेअरडेविल्सला 15 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावत 157 धावा केल्या. विजयासाठीच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेविल्सला 20 षटकांत 9 गडी गमावत 142 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह आरसीबीला दोन गुण मिळाले आहेत.

नाणेफेक जिंकत आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्फोटक फलंदाज गेल केवळ 6 धावा काढून बाद झाला. शेन वॅटसन (24), मनदीप सिंग (12) यांनाही फारसा प्रभाव दाखवता आला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केदार जाधवने मात्र एकाकी लढत देताना 37 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारासह 69 धावा करत संघाला दीडशेपर्यंत मजल मारुन दिली. त्याला स्टुअर्ट बिन्नीने 16 धावा करत चांगली साथ दिली. दिल्लीतर्फे मॉरिसने 3 तर झहीर खानने 2 गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया दिल्ली डेअरडेविल्स संघाला विजयासाठीचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा 20 षटकांत 9 गडी गमावत केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीची सलामीची जोडी आदित्य तरे (18) व सॅम बिलिंग्ज (25) झटपट बाद झाली. ऋषभ पंतने एकाकी झुंज देताना 36 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह 57 धावा केल्या. मात्र, मधल्या फळतील फलंदाजानी निराशा केल्यामुळे दिल्लीला 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 8 बाद 157 (ख्रिस गेल 6, शेन वॅटसन 24, केदार जाधव 69, स्टुअर्ट बिन्नी 16, ख्रिस मॉरिस 3/21, झहीर खान 2/31, पॅट कमिन्स 1/29), दिल्ली डेअरडेविल्स 20 षटकांत 9 बाद  142(आदित्य तरे 18, सॅम बिलिंग्ज 25, संजू सॅमसन 13, ऋषभ पंत 57, पवन नेगी 2/3, इक्बाल अब्दुल्ला 2/33, बिली स्टॅनकले 2/29).

 

वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत ऋषभ पंत थेट मैदानात

दिल्लीला शनिवारी आरसीबीविरुद्ध 15 धावांनी हार स्वीकारावी लागली. पण, या सामन्यात दिल्लीला विजय मिळवून देण्यासाठी ऋषभने दिलेली झुंज, किंबहुना या सामन्यात त्याने खेळण्याचे दाखवलेले धैर्य याचे भारतीय क्रिकेटमध्ये कौतुक होत आहे. ऋषभचे वडील राजेंद्र यांचे बुधवारी निधन झाले होते. यावेळी दिल्ली संघात असलेला ऋषभ तातडीने घरी परतला होता. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन तो शुक्रवारी पुन्हा दिल्ली संघात दाखल झाला. या सामन्यात ऋषभने 57 धावांची खेळी साकारली. मात्र, त्याच्या या झुंजार खेळीला विजयी समाधान लाभले नाही. पण या खेळीने त्याची परिपक्वता भारतीय क्रिकेटसमोर आली.

 

Related posts: