|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापालिका कार्यालयासमोर आज शिवप्रेमींचे धरणे आंदोलन

महापालिका कार्यालयासमोर आज शिवप्रेमींचे धरणे आंदोलन 

प्रतिनिधी / बेळगाव

कपिलेश्वर रोड येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण, नामकरणाबाबत मनपा सभागृहाच्या अजेंडय़ावर विषय घेण्यात आला नाही. यामुळे दि. 10 रोजी होणाऱया सभागृह बैठकीत ठराव मंजूर करावा, या मागणीकरिता मनपा कार्यालयात धरणे आंदोलन छेडण्यात येणार असून शिवभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नामकरणाचा ठराव करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण, याबाबत सभागृहात कोणतीच चर्चा झाली नाही. होणाऱया सभागृह बैठकीत हा विषय लक्षवेधी मांडून ठराव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी मनपा कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts: