|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Automobiles » सलग 13 वर्ष अल्टो ठरली ‘बेस्ट सेलर’ कार

सलग 13 वर्ष अल्टो ठरली ‘बेस्ट सेलर’ कार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अल्टो कारने सलग 13 वर्षे सर्वाधिक विक्री झालेली कार म्हणून विक्रम नोंदवला आहे. 2016-2017 या अर्थिक वर्षात एकूण 2 लाख 41हजार विक्री झालेली अल्टो एकमेकव कार ठरली आहे. मारूती-सुझुकी कंपनीने अल्टोच्या विक्रमी विक्रीचा दावा केला आहे.

मारूती -सुझुकीच्या विपणन आणि विक्री विभागाचे कार्यकारी संचालक आर. एस कलसी यांनी सांगितले , “अल्टो सलग 13 वर्षे विक्रीमध्ये अव्वल राहिली आहे. एखाद्या कारच्या लोकप्रियतेचे यापेक्षा मोठो प्रमाण काय असू शकते?’’

अल्टो कार सप्टेंबर 2000मध्ये बाजारात लाँच करण्यात आली होती. एक दशकाहून अधिक काळ या कारचा बाजारात दबदबा राहिला आहे. टू पेडल टेक्नॉलॉजीमध्ये अल्टो कारची किंमत सर्वात कमी आहे. मारूती – सुझुकी कंपनीने 2016-2017 या आर्थिक वर्षात एकूण 14 लाख 43 हजारांहून अधिक गाडय़ांची विक्री केली. यामध्ये 17 टक्के विक्री अल्टो कारची आहे. त्याच्यासोबता श्रीलंका, चिली, फिलिफाईन्स आणि ऊरूग्वे यांसारख्या देशांमध्येही 21 हजार अल्टो कारची निर्यात करण्या आली.