|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » बेल्जियम उपांत्य फेरीत

बेल्जियम उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था / चार्लेरोई

डेव्हिड गोफीनच्या शानदार विजयाच्या जोरावर बेल्जियमने इटलीवर 3-1  अशी विजयी आघाडी घेत डेव्हिस चषक स्पर्धेची गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठली आहे. आता बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या स्पर्धेची उपांत्य लढत होईल. फ्रान्स आणि सर्बिया यांच्यात उपांत्य फेरीची दुसरी लढत होईल.

फ्रान्सने शनिवारी ब्रिटनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला तर सर्बियाने स्पेनवर मात करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. बेल्जियमचा गोफीन याने परतीच्या एकेरी सामन्यात इटलीच्या लॉरेंझीचा 6-3, 6-3, 6-2 असा पराभव केला.

Related posts: