|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाण्यासाठी ग्रामस्थांना एसटीचा आधार!

पाण्यासाठी ग्रामस्थांना एसटीचा आधार! 

प्रवीण कांबळे/ लांजा

लांजा तालुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून नागरीकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आह़े चिंचुर्टी व हुंबरवणे गावात जलसाठे कोरडे पडल्याने येथील नागरिकांन 5 ते 6 किमी अंतरावरून पाणी आणावे लागत असून त्यासाठी त्यांनी एस्टीचा आधार घेतला आहे.

लांजा तालुक्याला याहीवर्षी पाणी टंचाईच्या भिषणतेचा सामना करावा लागत आह़े मागणीनुसार प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्यापही अनेक गावांना पाणी पुरवठा सुरू झालेलाच नाह़ी लांजा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी नुकतीच तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांची पाहणी केली होत़ी यामध्ये पालू परिसरातील हुंबरवणे व चिंचुर्टी गावात पाणी टंचाईची दाहकता अधिक निर्माण झाल्याचे चित्र असल्याचे प्रशासनानेनही मान्य केले आहे. मात्र अद्याप उपाययोजनेला प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे.

गाण्यातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत़ चिंचुर्टी व हुंगरवणे गावातील ग्रामस्थ आठवडाभरापूर्वी चिखलयुक्त पाणी गाळुन घेऊन पिण्यासाठी वापरत होत़े मात्र आता पाण्याचे साठे पूर्णतः खडखडीत झाले आहेत. हुंबरवणे व चिंचुर्टी दोन्ही गाव दुर्गम भागात वसल्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या 600 ते 700 च्या दरम्यान आह़े येथील जनतेच्या दैनंदीन जीवनासाठी पाण्याचा प्रश्न जटील बनला आह़े दोन्ही गावांना काहीच दिवसांत टँक्करद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े दोन्ही गावांनी मागणी अर्ज करुनही अद्यापही पाण्याचा टंकर गावात गेला नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली आहे .

जलसाठे पुर्णतः आटल्याने येथील जनजीवनावर परिणाम जाणवत आह़े माणसांसह पाळीव जनावरांनाही पाणी पुरवणे कठीण होऊन बसले आह़े प्रशासनाच्या टँकरची वाट न बघता येथील नागरीक सकाळी 9 वाजता गावात येणाऱया एस्टीने 5 कि.मी. अंतरावर असणाऱया केळवली गावांतील आपल्या नातवाईक व ओळखीच्या व्यक्तींकडून ड्रम, हांडे, कळशांच्या सहाय्याने पाणी नेऊन आपली तहान भागवत आहेत .

तालुक्यामधील प्रामुख्याने 13 गावे व 38 वाडय़ांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करा लागत असत़ो यासाठी गावातील ग्रामस्थांना कोसो दूरवर पाण्यासाठी भटकावे लागत आह़े यामध्ये पालू, धावडेवाडी, हुंबरवणे, चिंचुर्टी, कोचरी रिंगणे, कणगवली, वाडगाव, हसोळ, विविली, गोळवशी, कोंडगे, इसवली, पनोरे, रुण, वाकेड, आंजणंरी, कुरंग या गावांना उन्हाळ्यात पाण्याची भिषणता लवकर भेडसावत असत़े प्रशासनाकडे विविध गावांतून पाण्याची टँकरद्वारे मागणी वाढत आह़े या पार्श्वभू†िमवर लांजा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणी करुन परिस्थिती जाणून घेतली असता यामध्ये हुंबरवणे, चिंचुर्टी भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक दिसून आली आह़े अद्यापही चिंचुर्टी भागात पाण्याचा टंकर धावलेला नाह़ी येथील नागरिकांचे डोळे प्रशासनाच्या पाणी घेऊन येणाऱया टँकरकडे लागले आहेत.