|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » 2017 मध्ये आयटी क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च

2017 मध्ये आयटी क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

2017 या वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून 3.5 लाख कोटी डॉलर्स खर्च करण्यात येतील. 2016 च्या तुलनेत यामध्ये 1.6 टक्क्यांनी वाढ होईल असे गार्टनर या संस्थेने म्हटले आहे. मात्र हा अंदाज गेल्या तिमाहीच्या तुलनेत 2.7 टक्क्यांनी कमी आहे. याचे प्रमुख कारणे तेजीने मजबूत होणाऱया अमेरिकन डॉलर्सला सांगितले आहे.

डॉलर मजबूत झाल्याने 2017 मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील खर्च 67 अब्ज डॉलर्सने कमी होण्याचा अंदाज आहे. याचप्रमाणे आंतररास्ट्रीय कंपन्यांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याचे संकेत आहेत. 2017 मध्ये डेटा सेन्टर सिस्टम सेगमेन्टमध्ये 0.3 टक्क्यांनी वाढ होत 171 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. याचप्रमाणे एन्टरप्राईड सॉफ्टवेअरचा खर्च 5.5 टक्क्यांनी वाढत 351 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. याचप्रमाणे उपकरणांकडील खर्च 1.7 टक्क्यांनी वाढत 645 अब्ज डॉलर्सने आणि आयटी सेवांवर 2.3 टक्क्यांनी वाढत 917 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे असे गार्टनरचे संशोधन विभागाचे उपाध्यक्ष जॉन डेव्हिड लवलॉक यांनी म्हटले.