|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » खासदार सचिन तेंडुलकरची संसदेत अत्यल्प हजेरी

खासदार सचिन तेंडुलकरची संसदेत अत्यल्प हजेरी 

नवी दिल्ली

 भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधील कामगिरी दिमाखदार राहिली, परंतु राज्यसभा सदस्य म्हणून त्याच्या कामगिरीविषयी असे निश्चितच म्हणता येणार नाही. क्रिकेटच्या मैदानात 24 वर्षांच्या कारकीर्दीदरम्यान एखाद्यावेळीच मैदानापासून लांब राहिलेला सचिन खासदार या नात्याने संसदेत फारच कमी प्रमाणात उपस्थित राहिला. राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित सदस्यांपैकी सचिन आणि अभिनेत्री रेखा यांची संसदेतील उपस्थिती सर्वाधिक कमी ठरली आहे. सचिन 2012 साली खासदार म्हणून नामनिर्देशित झाला होता आणि 2013 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. परंतु तेव्हापासून आतापर्यंत 348 दिवसांच्या सत्रात तो फक्त 23 वेळा संसदेत उपस्थित राहिला आहे. तर अभिनेत्री रेखा या काळात फक्त 18 वेळा संसदेत उपस्थित होत्या. या कालावधीत सचिन यांच्यावर एकूण 58.8 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती राज्यसभेकडून उपलब्ध झाली आहे. राज्यसभा सदस्य या नात्याने सचिनला प्रतिमहिना 50 हजार रुपयांचे वेतन मिळते. याशिवाय प्रतिमहिना 45 हजार रुपये संसदीय क्षेत्रासाठी खर्च, 15 हजार रुपये कार्यालय खर्च आणि दैनिक भत्त्याच्या स्वरुपात मिळतात.