|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » सुलतान अझलन शाह चषकासाठी संघ घोषित

सुलतान अझलन शाह चषकासाठी संघ घोषित 

गोलरक्षक श्रीजेशकडे नेतृत्व, कनि÷ संघातील खेळाडूंना संधी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारताचा स्टार गोलरक्षक पीआर श्रीजेशकडे या महिन्याच्या अखेरपासून सुरू होणाऱया सुलतान अझहल शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. मलेशियातील इपोह येथे ही स्पर्धा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मनप्रीत सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कनि÷ विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकलेल्या संघातील डिफेंडर गुरिंदर सिंग, मिडफिल्डर्स सुमित व मनप्रीत यांना या स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळणार आहे. मुंबईचा 21 वषीय गोलरक्षक सुरज करकेराने मागील वषी कनि÷ संघातून इंग्लंड दौरा केला होता. याशिवाय त्याने रशियातील युरआशिया चषक स्पर्धेत आणि गेल्या वषी झालेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यालाही मलेशियातील स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले आहे. वरि÷ खेळाडूंचे राष्ट्रीय शिबिर सुरू होण्याआधी मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी भविष्याचा विचार करून कनि÷ खेळाडूंना योग्य वेळी संधी देण्यावर भर दिला होता. त्यांना अशी संधी मिळाल्यास 2018 मधील विश्वचषक व 2020 मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये ते भारताला यश मिळवून देऊ शकतील, असे त्यांनी म्हटले होते. हे ध्येय ठेवूनच त्यांनी कनि÷ संघातील खेळाडूंना या स्पर्धेसाठी संधी दिली आहे.

गुरिंदर, सुमित व मनप्रीत यांनी भारताला कनि÷ विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी मागील अझलन शाह चषक स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यावेळी भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदक मिळाले होते. ‘या वषी वर्ल्ड लीग सेमिफायनल, आशिया चषक व ओडिशा पुरुष हॉकी लीग फायनल अशा तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. त्याआधी नव्या कॉम्बिनेशन्सना आजमावून पाहण्याचा आमचा उद्देश आहे,’ असे ओल्टमन्स यांनी स्पष्ट केले. ‘या मोठय़ा स्पर्धांआधी काही लढती खेळावयास मिळणार आहेत. वर्ल्ड लीग सेमिफायनलआधी बेल्जियम व जर्मनीविरुद्ध आणि ऑगस्टमध्ये बेल्जियम व हॉलंड यांच्याविरुद्ध खेळावयास मिळणार आहे. हे संघ चांगले प्रतिस्पर्धी असून त्यांच्याविरुद्ध आपल्या खेळाडूंची उत्तम चाचणी होणार आहे. शिवाय अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून योग्य प्रदर्शन होत आहे का, हेही त्यातून आजमावून पाहता येणार आहे,’ असेही ओल्टमन्स म्हणाले.

अनुभवी सरदार सिंग, चिंगलेनसाना सिंग कांगुजम, हरजीत सिंग, सुमित व मनप्रीत मध्यफळी सांभाळतील तर बचावफळीत रुपिंदर पाल सिंग, परदीप मोर, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग यांचा समावेश आहे. आघाडी फळी एसव्ही सुनील, तलविंदर ंिसंग, आफान युसूफ, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग यांनी भक्कम केली आहे. ‘अनुभवी व युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण असणारा संघ आम्ही मलेशियात नेणार आहोत. यापैकी काहीजण वरि÷ स्तरावर प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड यांसारख्या संघांच्या तुलनेत आपला संघ कुठे आहे, हे पाहणे आमच्यासाठी आव्हान असेल,’ असेही ओल्टमन्स म्हणाले.

अझलन शाह चषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ : गोलरक्षक-पीआर श्रीजेश (कर्णधार), सुरज करकेरा. बचावफळी-परदीप मोर, सुरेंदर कुमार, रुपिंदर पाल सिंग, हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग. मध्यफळी-चिंगलेनसाना सिंग कांगुजम, सुमित, सरदार सिंग, मनप्रीत सिंग (उपकर्णधार), हरजीत सिंग, मनप्रीत. आघाडी फळी-एसव्ही सुनील, तलविंदर सिंग, मनदीप सिंग, आफान युसूफ, आकाशदीप सिंग.