|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शाळकरी मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या

शाळकरी मुलीची पेटवून घेऊन आत्महत्या 

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर शहराजवळील हलकर्णी येथे एका शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सदर मुलीचे नाव रोहिणी विश्वास गुरव (वय 13) असे आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. ती येथील सरस्वती विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी परीक्षेचा निकालही लागला होता. यामध्ये तिने 96 टक्के गुण मिळविले होते. सोमवारी तिच्या आई-वडिलांनी रोहिणीचा तेरावा वाढदिवसही साजरा केला होता.

मंगळवारी दुपारी तिची आई गांधीनगर येथील शनैश्वर मंदिरात महाप्रसादासाठी गेली होती. तिच्या वडिलांचा हलकर्णी येथे दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते ही दुपारी जेवण करून दुकानाकडे गेले होते. यावेळी घरात कोणी नसताना तिने स्वतःला पेटवून घेतले. काही वेळातच तिच्या आईने घरी येऊन पाहिले असता रोहिणी जळालेल्या अवस्थेत पडलेली होती. हे पाहून तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून लोक जमा झाले. व रोहिणीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीनंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रोहिणी ही गुरव कुटुंबाची एकुलती एक मुलगी होती.

Related posts: