|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » राम मंदीर उभारण्यास गुंडांचा विरोध : मोहन भागवत

राम मंदीर उभारण्यास गुंडांचा विरोध : मोहन भागवत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

आयोध्येत राम मंदीर उभारण्यास मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा विरोध नाही तर यावरून राजकारण करणारश कट्टरपंथी आणि गुंड लोकच राम मंदिर उभाररू देत नसल्याचा आरोफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला. यावरच न थांबता त्यांनी न्यायलयाकडून यावर तोडगा निघणार नासव्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात राम मंदीर वादावरून परस्पर समजोता व्हावा म्हणून सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत असातानाच भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणावर परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा. दोन्ही पक्षांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यास न्यायालय मध्यस्थी करण्याश तयार असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस खेहर यांनी नोंदवले होते. आपण स्वतः यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटल होते.