|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नफावसुलीने बाजारात विक्रीचे वर्चस्व

नफावसुलीने बाजारात विक्रीचे वर्चस्व 

बीएसईचा सेन्सेक्स 145, एनएसईचा निफ्टी 33 अंशाने घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

घरगुती बाजारात विक्री झाल्याने दबाव दिसून आला. तेजीने चढ-उतार आल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी कमजोर होत बंद झाले. कमजोरी आल्याने निफ्टी 9,200 च्या खाली घसरला होता, तर सेन्सेक्स 250 अंशापर्यंत घसरला होता.  बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 145 अंशाने कमजोर होत 29,643 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 33 अंशाने घसरत 9,203 वर बंद झाला.

मिडकॅप व स्मॉलकॅप समभागात विक्री दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.6 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी कमजोर झाला.

ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, वाहन, धातू, आयटी आणि बँकिंग समभागात विक्रीचे वर्चस्व होते. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी घसरत 21,667 वर बंद झाली. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.3 टक्के, वाहन निर्देशांक 0.5 टक्के, धातू निर्देशांक 0.7 टक्के आणि आयटी निर्देशांक 0.75 टक्क्यांनी घसरला.

बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1 टक्के आणि ऊर्जा निर्देशांकात 1 टक्क्यांनी घसरण झाली. औषध आणि रिअल्टी समभागात चांगली खरेदी झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 0.9 टक्क्यांनी आणि बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारला.

दिग्गज समभागांची कामगिरी

भारती इन्फ्रा, बॉश, आयशर मोटर्स, सन फार्मा, येस बँक, हीरो मोटो, ल्यूपिन, बजाज ऑटो आणि डॉ. रेड्डीज लॅब 3.25-0.5 टक्क्यांनी वधारले. टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, विप्रो, झी एन्टरटेनमेन्ट, ऍक्सिस बँक, गेल आणि टाटा मोटर्स 2.2-1.6 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात एमआरपीएल, बजाज फिनसर्व्ह, एनएलसी इंडिया, बर्जर पेन्ट्स, पेट्रोनेट एनएनजी 4.5-2.2 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात हबटाऊन, एप्कोटेक्स इन्डस्ट्रीज, पोलारिस कन्सल्टिंग, स्टॅम्पेड कॅपिटल आणि अलेम्बिक 20-80.2 टक्क्यांनी वधारले.

Related posts: