|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जर्मनीच्या क्लब संघाला लक्ष्य बनवून करण्यात आले 3 स्फोट

जर्मनीच्या क्लब संघाला लक्ष्य बनवून करण्यात आले 3 स्फोट 

डोर्टमंड

: जर्मनीचा क्लब बोरसिया डोर्टमंडच्या फुटबॉल संघाला नेणाऱया बसला मंगळवारी संध्याकाळी लक्ष्य बनवून 3 बॉम्बस्फोट करण्यात आले. या स्फोटात स्पेनचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मार्क बार्टा जखमी झाले आहेत. डोर्टमंडचा संघ चॅम्पियन्स लीगमध्ये मोनाकोविरोधात उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला आहे.उर्वरित खेळाडू सुरक्षित असून स्फोटामुळे सर्वांना धक्का बसला आहे. बार्टा यांच्या मनगटाला काचेमुळे जखम झाली आहे. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून स्फोटानंतर सामना एक दिवसासाठी टाळण्यात आल्याची माहिती डोर्टमंड क्लबने दिली.घटनास्थळापासून एक पत्र मिळाले असून यात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याचा दावा करण्यात आला आहे, याची चौकशी सुरू असल्याचे पश्चिम जर्मनीच्या डोर्टमंड शहराचे पोलिसप्रमुख ग्रेगर लँग यांनी सांगितले.

स्फोटके रस्त्यानजीकच्या झुडुपांमध्ये लपविण्यात आली होती. बस जवळून जाताच स्फोट घडविण्यात आला. स्फोटामुळे बसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.