|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सोमालिया लष्कराकडून आठ भारतीयांची सुटका

सोमालिया लष्कराकडून आठ भारतीयांची सुटका 

वृत्तसंस्था/ मोगादिशू

समुद्री चाच्यांनी (लुटारू) ओलीस ठेवलेल्या आठ भारतीयांची सोमालिया लष्कराने सुटका केली आहे. भारतीय खलाशी असणाऱया जहाजावर चाच्यांनी ताबा मिळवला होता. यानंतर होबयो शहरानजीक असणाऱया गावात भारतीय खलाशांना ओलीस ठेवण्यात आले होते. सोमलिया लष्काराने कारवाई करत त्यांची सुटका केली. तसेच चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती होबयोचे महापौर अहमद अली यांनी दिली. दहा भारतीय खलाशांचे अपहरण झाले होते. यातील दोघांची सोमवारीच सुटका झाल्याचे सूत्रांनी सागितले.  पाच वर्षांपूर्वा सोमालियातील समुद्री चाच्यांकडून होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय जहाज उद्योगासमोरील मोठे आव्हान होते. याचा परिणाम या उद्योगावर होत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर ठोस कारवाई झाल्याने मागील काही वर्ष सोमालियातील समुद्री चाच्यांच्या  कारवाया   थंडावल्या होत्या. मात्र त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मार्च महिन्यात त्यांनी तेल वाहक जहाजाचे अपहरण केले होते.