|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ात लाखापेक्षा कमी थकीत पीक कर्ज 240 कोटी

जिल्हय़ात लाखापेक्षा कमी थकीत पीक कर्ज 240 कोटी 

प्रतिनिधी/ सांगली

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील शेतकऱयांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार राज्यातही एक लाखापेक्षा कर्जमाफ करावे अशी मागणी विरोधकांच्यासह सर्व शेतकऱयांची आहे. पण राज्यसरकार अद्यापही या कर्जमाफीबाबत निर्णय घेत नाही. दरम्यान राज्य बँकेने मात्र एक लाखापेक्षा कमी थकीत असणाऱया पीक कर्जाची माहिती जिल्हा बँकेकडून मागविली आहे. जिल्हय़ातील 31 हजार 978 शेतकऱयांची 240 कोटी रूपयांचे पीक कर्ज थकीत असल्याच माहिती जिल्हा बँकेने राज्य बँकेला अहवाल देवून माहिती दिली आहे.

जिल्हय़ात कर्जदार शेतकऱयांची संख्या मोठयाप्रमाणात आहे. पण अनेक शेतकरी हे प्रामाणिकपणे पीक कर्ज भरतात आणि शुन्य टक्के व्याज योजनेचा लाभ घेतात. पण तरीही जिल्हय़ातील 31 हजार 978 शेतकऱयांचे एक लाखापेक्षा कमी पीक कर्ज अजूनही थकीत आहे. त्याची किंमत 240 कोटी इतकी आहे. राज्य बँकेने नुकतीच याबाबत जिल्हा बँकेकडे माहिती मागितली होती. त्यानुसार जिल्हा बँकेने जिल्हय़ातील सर्व सोसायटय़ांच्या माध्यमातून या थकीत पीककर्जाची माहिती एकत्रित केली आहे. त्या माहितीच्या आधारे जिल्हय़ातील 31 हजार 978 शेतकऱयांची पीक कर्जाची रक्कम थकी आहे.

जिल्हा बँकेने हा अहवाल आता राज्य बँकेकडे पाठविला आहे. राज्य बँकेकडून संपूर्ण राज्यातील थकीत पीककर्जाची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. आणि ही माहिती एकत्रित केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान एक लाखापर्यंत थकीत पीककर्ज माफ करण्याची किंवा याबाबत सवलत देण्याची शक्यता राज्यशासनाकडून आहे. त्यामुळेच ही माहिती एकत्रित केली जात असल्याचे समजते.

Related posts: