|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नेहरूनगर येथे 300 ग्रॅम गांजा जप्त

नेहरूनगर येथे 300 ग्रॅम गांजा जप्त 

प्रतिनिधी / बेळगाव

एपीएमसी पोलिसांनी नेहरूनगर परिसरात गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक करून त्यांच्या जवळून 300 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

सचिन तिप्पाण्णा तोरे (वय 33, रा. काकतीवेस), गौस सलीम बिडी (वय 23, रा. काकती), अशी त्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. या दोघा जणांविरुद्ध भादंवि 20 (बी) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेची कारवाई पूर्ण करून सचिन व गौस यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.   

Related posts: