|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » एसयूव्ही विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ

एसयूव्ही विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

देशात एसयूव्ही प्रकारातील गाडय़ांच्या मागणीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत अहे. या गाडय़ा प्रदूषणकारी असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून म्हणण्यात आले, तरी त्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षात एसयूव्हीचा विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. प्रवासी वाहन प्रकारात विक्री करण्यात आलेल्या चार गाडय़ांपैकी एक गाडी ही एसयूव्ही प्रकारातील असल्याचे वाहन क्षेत्राची संघटना सिमायच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

काही वर्षांपूर्वी मिनी कार प्रकाराला मागणी करण्यात येत होती. गेल्या वर्षात एसयूव्ही प्रकारातील गाडय़ांच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी 7.62 लाख युनिट्सची विक्री करण्यात आली. एकूण प्रवासी कार प्रकारात 10 टक्क्यांनी वाढ होत 30.4 लाखावर पोहोचली आहे. देशातील कार बाजारपेठेतील एसयूव्ही प्रकारच्या कारचा हिस्सा आता 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. 5 वर्षांपूर्वी हा हिस्सा 14 टक्क्यांवर होता. एसयूव्ही गाडय़ा दणकट, बसण्यासाठी उत्तम सोय, इंटिरिअर्स आकर्षित करणारे, स्टायलिश, बाहेरील डिडाईन आकर्षक आणि भारतातील कोणत्याही वातावरणात चालण्यास योग्य असल्याने त्यांची मागणी वाढत आहे.

मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझ्झा, हय़ुंदाई क्रेटा, फोर्ड इकोस्पोर्ट आणि टायोटा इनोवहा क्रिस्टा या गाडय़ांना गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रेझ्झा आणि इकोस्पोर्ट या कारची किंमत 10 लाखापेक्षा कमी असल्याने उत्तम प्रतिसाद मिळाला होता. एसयूव्ही प्रकारात डिझेल इंजिनना भारतीयांकडून पसंती दिली जात आहेत. कंपन्यांकडून नवीन मॉडेल सादर करण्यात राहिल्यास ही मागणी वाढत राहील असा अंदाज आहे.