|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आवाडे बँकेचे अधिकारी कुंभार यांचा निवृत्ती सत्कार

आवाडे बँकेचे अधिकारी कुंभार यांचा निवृत्ती सत्कार 

प्रतिनिधी /इचलकरंजी :

येथील कल्लाप्पाण्णा आवाडे  इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. कुंभार यांच्या निवृत्ती निमित्त सत्कार सोहळा पार पडला. बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनुराधा कुंभार यांचा सत्कार माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, भविष्यात बँकेस जेव्हा जेव्हा गरज लागेल त्या वेळी आपण सल्लागाराची भूमिका पार पाडावयाची आहे. कुंभार हे सेवेतून निवृत्त झाले असले तरी बँकेच्या परिवारात कायम राहणार आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही पी. टी. कुंभार यांच्या  15 वर्षाच्या कारकिर्दित बँकेचा व्यवसाय हा 500 कोटींवरून 3000 कोटी रूपयांवर गेला आहे. तसेच त्यांनी कर्मचाऱयांना बँकिंगचे प्रशिक्षण देवून चांगली फळी तयार केली असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी कुंभार यांनी सर्वांच्या सहकार्याने ही बँक अग्रगण्य होवू शकली असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी चेअरमन अशोक सौंदत्तीकर, व्हा. चेअरमन बाबासो पाटील, विजय कामत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, विलास गाताडे, एस. आर. शहा, ऍड. स्वानंद कुलकर्णी यांच्यासह सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व सर्व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related posts: