|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उत्तम भोई यांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी

उत्तम भोई यांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी 

वार्ताहर /पट्टणकुडी :

घरची परिस्थिती बिकट असूनही केवळ धार्मिक प्रवृत्ती जोपासत अन्नदानाचे महान कार्य दत्तभक्त उत्तम भोई करीत आहेत. त्यांचे हे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन खडकलाट पोलीस स्थानकाचे फौजदार बसगौडा पाटील यांनी केले.

येथील गुरुदत्त सेवा मंडळातर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फौजदार बसगौडा पाटील, पट्टणकुडी बीट पोलीस अधिकारी के. के. सनदी, पत्रकार सुनील तराळ, माजी सैनिक सुनील जाधव, उत्तम भोई, रणजीत परिट, अशोक राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. सागर परिट यांनी स्वागत केले. पौर्णिमेनिमित्त काकड आरती, अभिषेक, नामजप, निपाणीतील महाजन महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. रात्री हरिहर भजनी मंडळ वाळकी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी भरत पांगरे, श्रीकांत हेगडे, किरण घोरपडे, दीपक घाटगे, जितेंद्र जाधव, भरत पुणेकर, कृष्णा तेली, विनायक शिंदे, लखन परिट, प्रभाकर हंडे, प्रमोद माने, दत्ता लोहार यांच्यासह गुरुदत्त सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.