|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » घरपट्टीचे चलन सहा कार्यालयात उपलब्ध

घरपट्टीचे चलन सहा कार्यालयात उपलब्ध 

 प्रतिनिधी /बेळगाव :

चालू वर्षाची घरपट्टी वसूल करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून एप्रिल महिन्यात पाच टक्के सूट देण्यात येत आहे. मात्र कोणत्या वॉर्डचे चलन कोणत्या कार्यालयात मिळते याची माहिती नसल्याने चलन घेण्यासाठी मालमत्ताधारक कार्यालये फिरत आहेत. याबाबत कोणतीच माहिती महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नसल्याने मालमत्ताधारकांची गैरसोय होत आहे.

महापालिकेने 34 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आतापर्यंत 25 कोटी 27 लाख घरपट्टी वसुल करण्यात आली असून उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे. 76470 मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. तर 31530 मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरणा केली नाही.  2017-18 आर्थिक वर्षाची घरपट्टी वसूल करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिलमध्ये  2017-18 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सूट देण्यात येत आहे. पण चलन देण्याची सुविधा कोणत्या कार्यालयात करण्यात आली आहे. याबाबत कोणतीच माहिती महापालिका प्रशासनाने दिली नाही. मागील काही दिवसात महसूल निरीक्षकांची बदली करून विविध वॉर्डच्या जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. यामुळे चलन कोणत्या कार्यालयात मिळते याची माहिती मिळणे कठीण झाले आहे.