|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » छोटे कचरा व्यवस्थापन प्रकल्प गोव्यासाठी योग्य

छोटे कचरा व्यवस्थापन प्रकल्प गोव्यासाठी योग्य 

प्रतिनिधी /पणजी :

“मुंबई येथे स्थित असलेली एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी ही गोव्यामध्ये आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी नियोजन करीत आहे. जैवविघटनात्मक कचरा हाताळण्यासाठी उपयोगी पडणाऱया विकेंद्रीत कचरा व्यवस्थापन प्रणालीच्या विक्रीसंदर्भात पंचायती आणि महानगरपालिकांशी संपर्क साधण्याच्याविषयी नियोजन सुरू आहे. छोटे कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प गोव्यासारख्या राज्यासाठी योग्य आहेत’’ असे प्रतिपादन मुंबई येथील एक्सेल इंडस्ट्रीजचे सौरभ शहा यांनी नुकतेच मिरामार-पणजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना केले.  

मिरामार येथील गास्पर डायस सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱयांना या लघु कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्पांबद्दल माहिती दिली. एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीच्या पर्यावरण व जैवतंत्रज्ञान विभागाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी हाताळणारे सौरभ सिन्हा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की छोटे लघु कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याविषयी सरकारकडे बोलणी सुरू आहे. हे प्रकल्प जैविक कचऱयाचे खतामध्ये रूपांतर जलद गतीने करतात आणि शेतामध्ये निघून जाणाऱया कचऱयाचे प्रमाण कमी करतात. एक्सेल इंडस्ट्रीजतर्फे आतापर्यंत 50 जैव कचरा रूपांतर प्रक्रिया करणाऱया प्रणाली (ऑर्गेनिक वेस्ट कन्वर्टर ा ओडब्ल्यूसी) हॉटेल्स वगैरे आस्थापनांना दिलेल्या असून अशाच प्रकारच्या प्रणाली शहरी भागातील सरकारी संस्थांना कंपनीतर्फे पुरवल्या जाऊ शकतात, असे शहा म्हणाले.