|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण 

ऑनलाईन टीम / नागपूर   :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर जिह्यातील कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीजप्रकल्पातील नवीन उर्जासंचांच लोकार्पण केले आहे. पंतप्रधान आज नागपूर दौऱयावर आले आहेत. या दौऱयात पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. तसेच आधार पे योजनेचीही सुरूव<ात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावेळी मोदीनी कोराडी थर्मल प्लांटची पाहणी केली आहे.

आपल्या दौऱयात नरेंद्र मोदींनी आयआयटी, आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांचेही भूमिपूजन केले आहे. तसेच म्हाडाच्या नव्या गृहनिर्माण्ण योजनेचीही सुरूवात आजपासून करण्यात आली आहे. मोदींच्या नागपूर दौऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, चंद्रशंखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts: