|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तेऊरवाडी साठवण तलावासाठी कुणाचीही बिशाद चालणार नाही – संगीता चौगुले

तेऊरवाडी साठवण तलावासाठी कुणाचीही बिशाद चालणार नाही – संगीता चौगुले 

वार्ताहर / कोवाड

तेऊरवाडी, कमलवाडी साठवण तलावाला विरोध करणाऱया शेतकऱयांना समजावून सांगितले जात आहे. पुढील काही दिवसातही ग्रामस्थांना समजावून पटवून सांगितले जाईल. पण विरोधासाठी विरोध म्हणून केला गेला तर कायदेशीर मार्गाने जावे लागेल. मग त्यानंतर कुणाचीही बिशाद चालणार नाही. -असा सज्जड इशारा प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दिला.

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे नव्याने होणाऱया साठवण तलावाच्या आयोजित ग्रामस्थांच्या सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच एकनाथ पाटील होते.

प्रास्ताविक रामराव गुडाजी यांनी केले. प्रांताधिकारी संगीता चौगुले पुढे म्हणाल्या, नियोजित साठवण तलाव झाल्यास तेऊरवाडी, कमलवाडी ग्रामस्थ आणि शेतकऱयांनाच होणार आहे. या दोन्ही गावच्या शेतकऱयांच्या शेतातील पिकांना मुबलक पाणी मिळेल. 400 हेक्टर जमिन ओलीताखाली येईल. त्यामुळे पिके जोमाने येतील. आणि शेतकऱयांच्या हातात पैसा नांदेल. त्या पैशातून मुलेबाळे उच्च शिक्षण घेतील. त्यांना चांगल्या नोकऱया, धंदे करता येतील. यामुळे दोन्ही गावचे अर्थकारण निश्चितच बदलेल.

तेऊरवाडी गावाला गेल्या कित्येक वर्षापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शेतकऱयांच्या जमिनी ओसाड पडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना तर फेब्रुवारी ते जून पर्यंत वणवण करावी लागते. नियोजित तलाव झाल्यास प्यायला भरपूर पाणी आणि शेतीला मुबलक पाणी मिळेल. बारा महिने शेतकऱयांच्या जमिनी ओलीताखाली येतील. मात्र त्यासाठी ज्या शेतकऱयांच्या जमिनी जाणार आहेत. त्या शेतकऱयांनी थोडी त्यागाची भूमिका ठेवली पाहिजेत. त्यांना शासनाच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मोबदला व इतर नियम लागू होणारच. कमी जागेत, कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी कसे साचेल, याचा विचार शासनाचे तज्ञ अधिकारी करत असतात. त्यामुळे त्या तांत्रिक अधिकाऱयांना सर्व्हे करताना सहकार्य करा. त्यानंतर लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी नियोजित तलावासंदर्भात योग्य निर्णय घेऊ. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी व्ही. डी. शिंत्रे, शाखा अभियंता आर. जे. पाटील, नायब तहसीलदार नांगरे, सौ. मनिषा पाटील, माजी सरपंच वाय. बी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाश पाटील, पुंडलिक पाटील, प्रकाश दळवी, दत्तात्रय पाटील, रामराव गुडाजी, हिरामणी पाटील, बी. टी. पाटील, आर. जे. पाटील उपस्थित होते. आभार माजी सरपंच मारूती पाटील यांनी मानले.

Related posts: