|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » ईपीएफ वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे

ईपीएफ वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे 

नवी दिल्ली

 कर्मचारी निर्वाहनिधी संघटनेने ईपीएफओने सध्याचे वेतन मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मागे घेतला. सध्या 15 हजार रुपयांचे वेतन असणाऱयांकडून पीएफ जमा करण्यात येत होता. ही मर्यादा 25 हजारापर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव होता. यामुळे देशातील 1 कोटी कर्मचाऱयांना पीएफचा लाभ मिळणार होता. अर्थ मंत्रालयाच्या दबावातून हा निर्णय ईपीएफओने मागे घेतला अहा कामगार संघटनांचा आरोप आहे. सध्या 15 हजार रुपये मूळ वेतन आणि डीए असणाऱया कर्मचाऱयांना पीएफ देणे अनिवार्य आहे. सीबीटीच्या अजेंडय़ावर अनेक महिन्यापासून हा प्रस्ताव होता. अर्थ मंत्रालयाच्या दबावातून हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.