|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत दोन कोटींचा बांबू प्रकल्प

सावंतवाडीत दोन कोटींचा बांबू प्रकल्प 

सावंतवाडी : मागासवर्गीय महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी सावंतवाडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर भवनात दोन कोटी रुपयांचा बांबू प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे राबविण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी समाजमंदिर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाला केसरकर यांनी पुष्पहार अर्पण केला. पालिकेतर्फेही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, नगरसेविका माधुरी वाडकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी उपस्थित होते.

केसरकर पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला विचार दिले. या विचारानुसार आपण चालत आहोत. सावंतवाडी पालिकेतर्फे समाजमंदिरात बांबू प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा मोठा प्रकल्प पालिकेला चालविणे शक्य नाही. त्यामुळे एमटीडीसीमार्फत चालविण्यात येणार आहे. पाच कोटी रुपये कॉयर प्रकल्पासाठी मंजूर आहेत. बांबू व कॉयर प्रकल्पामार्फत या भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या हाताला काम देण्यात येईल. यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनीही विचार मांडले.

Related posts: