|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘त्या’ दारू विक्रेत्यावर होणार उत्पादन शुल्कची कारवाई

‘त्या’ दारू विक्रेत्यावर होणार उत्पादन शुल्कची कारवाई 

प्रतिनिधी/ दापोली

सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध झुगारून राज्य महामार्गालगतच चढय़ा भावाने मद्य विक्री करणाऱया दापोलीतील हॉटेल मालकावर कठोर कारवाईचे संकेत उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. बेकायदा दारू विक्री विरोधातील ‘तरूण भारत’च्या या धडक मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भर लोकवस्तीमध्ये असणाऱया या हॉटेलच्या मागील दारात उभा राहून हॉटेल मालक चढय़ा भावाने बिअर व दारू विकत होता. याची कुणकुण लागल्यावर ‘तरूण भारत’च्या पत्रकारांनी या घटनेचे शुटींग करून हा छुप्या दारूविक्रीचा प्रकार बातमीद्वारे उघड केला. हे वृत्त ‘तरूण भारत’मध्ये प्रसिध्द झाल्यावर याची उत्पादन शुल्क विभागाने दखल घेतली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्याने योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उत्पादन शुल्क विभागाचे खेड विभाग निरिक्षक महेश शेंडे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. नियम मोडून दारू विक्री करणाऱया या हॉटेल मालकावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

 

Related posts: