|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » काळ्या-पिवळ्या टॅक्सीही देऊ शकते एसी सेवा

काळ्या-पिवळ्या टॅक्सीही देऊ शकते एसी सेवा 

राज्यातील महानगरांमध्ये बिगर एसीच्या काळय़ा-पिवळया टॅक्सी आणि एसी कुल पॅब कार्यरत आहेत. मात्र, काळया-पिवळया टॅक्सींमध्ये एसी असूनसुध्दा ती सेवा शासनाची मान्यता नसल्याने प्रवाशांना देता येत नव्हती. अखेर त्याला शासनाने मंजुरी दिली असून प्रवाशांच्या मागणीनुसार एसी सेवा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी नियमित भाडे दरावर 20 टक्के जादा भाडे आकारून  ही सेवा प्रवाशांना उपलब्ध होईल.

सध्या राज्यात व मुंबई महानगर क्षेत्रात मोटार वाहन उत्पादकांकडून एसी वाहनांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असते. एसी गाडय़ा असलेल्या काळय़ा-पिवळय़ा टॅक्सींचाही त्यात समावेश आहे. परंतु, एसी असुनही सेवा प्रवाशांना देता येत नव्हती. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रवाशांच्या मागणीनुसार, एसी सेवा देता यावी अशी मागणीच टॅक्सी संघटनांनी उचलून धरली होती. अखेर शासनाकडून त्याला मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार, काळय़ा-पिवळय़ा टॅक्सींमध्ये एसी यंत्रणा चालू स्थितीत असेल आणि प्रवाशाने मागणी केल्यास ती सेवा टॅक्सीचालक देऊ शकतो. मात्र, नियमित भाडेदरापेक्षा 20 टक्के जादा भाडे प्रवाशांना मोजावे लागेल. ज्या काळया-पिवळया टॅक्सींना एसी यंत्रणा उपलब्ध असेल अशा वाहनाच्या समोरच्या काचेवर लाल अक्षरात एसी असा

लोगो लिहिण्यात किंवा चिकटविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य परिवहन प्राधिकरण आणि इतर क्षेत्रीय प्राधिकरणांनी शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत तात्काळ कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.

Related posts: