|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » केकेआरचा सनरायजर्सवर विजय

केकेआरचा सनरायजर्सवर विजय 

आयपीएल 10 : सामनावीर उथप्पाचे अर्धशतक, पांडेची उपयुक्त खेळी, भुवनेश्वरचे 3 बळी वाया

वृत्तसंस्था / कोलकाता

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमधील सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव करून या मोसमात घरच्या मैदानावरील दुसरा विजय नोंदवला. केकेआरने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 172 धावा जमविल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करीत सनरायजर्स हैदराबादला 20 षटकांत 6 बाद 155 धावांवर रोखत मोसमातील तिसरा विजय मिळविला. अर्धशतकी खेळी करणाऱया रॉबिन उथप्पाला सामनावीराचा बहुमान मिळाला.

या विजयानंतर केकेआरने 4 सामन्यांत 6 गुण मिळवित गुणतक्मत्यात पुन्हा आघाडीचे स्थान मिळविले आहे. चारपैकी फक्त एक सामना त्यांनी गमविला आहे.  सनरायजर्सतर्फे कर्णधार डेव्हिड वॉर्नर व युवराज सिंग यांनी प्रत्येकी 26 धावा जमविल्या. केकेआरतर्फे उथप्पाने 39 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह 68 धावांची खेळी केली तर मनीष पांडेने 35 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत केकेआरतर्फे ख्रिस वोन्सने 2 तर युसूफ पठाण, सुनील नारायण, ट्रेंट बोल्ट व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

हैदराबादची चमकदार सुरुवात, पण..

173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर वॉर्नर व शिखर धवन यांनी पहिल्या सहा षटकांत दमदार प्रदर्शन करीत 46 धावा फटकावल्या तेव्हा ते हा सामना जिंकणार असेच वाटत होते. युसूफ पठाणने धवनला बाद करीत ही जोडी फोडल्यानंतर केकेआरने सामन्यावर नियंत्रण मिळविले. यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वॉर्नरला 26 धावांवर बाद केले. धवनने 22 चेंडूत 23 धावा केल्या. नंतर युवराजने छोटी पण जलद खेळी करताना 16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 26 धावा फटकावल्या. वोक्सने त्याची खेळी संपुष्टात आणल्यानंतर केकेआरचा विजय जवळपास निश्चित झाला. युवराज पाचव्या गडय़ाच्या रूपात 112 धावसंख्येवर बाद झाला. नंतरच्या फलंदाजांना केकेआरच्या अचूक माऱयापुढे आवश्यक धावगती राखता आली नाही आणि 20 षटकांत त्यांना 6 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. हेन्रिकेसने 10 चेंडूत 13, हुडाने 7 चेंडूत 13, कटिंगने 10 चेंडूत 15 धावा केल्या तर नमन ओझा 11 चेंडूत 11 व बिपुल शर्मा 14 चेंडूत 2 चौकार, एक षटकारासह 21 धावा काढून नाबाद राहिले.

उथप्पा-मनीषने डाव सावरला

तत्पूर्वी, केकेआरने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर सहाव्या षटकातच त्यांची स्थिती 2 बाद 40 अशी झाली. पण उथप्पा व पांडे या कर्नाटकाच्या जोडीने 52 चेंडूत 77 धावांची भागीदारी करून डाव सावरला आणि संघाला सुस्थितीत पोहोचवले.  उथप्पा 117 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मनीषने फटकेबाजी करीत धावगती कमी होऊ दिली नाही. पण 18 व्या षटकात भुवनेश्वरने त्याची खेळी संपुष्टात आणल्यानंतर केकेआरच्या धावगतीलाही ब्रेक लागला. पांडे बाद झाल्यानंतर केकेआरला फक्त 19 धावांची भर घालता आली. युसूफ पठाणने 15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 21 धावा फटकावल्या. याशिवाय गंभीरने 15 तर सुनील नारायणने 6 धावा केल्या. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करीत 4 षटकांत 20 धावा देत 3 बळी मिळविले. नेहरा, कटिंग व रशिद खान यांनी एकेक बळी मिळविले. रशिदने 4 षटकांत 29 धावा दिल्या. दोन्ही संघांतील ही आयपीएलमधील एकूण 14 वी लढत होती. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर केकेआरला एकदाही हैदराबादकडून हार पत्करावी लागलेली नाही.

संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 6 बाद 173 (सुनील नारायण 6, गंभीर 16 चेंडूत 15, उथप्पा 39 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह 68, मनीष पांडे 35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 46, युसूफ पठाण 15 चेंडूत नाबाद 21, सूर्यकुमार यादव 4, अवांतर 11, भुवनेश्वर कुमार 3-20, नेहरा 1-35, कटिंग 1-41, रशिद खान 1-29), सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 155 (वॉर्नर 30 चेंडूत 4 चौकारांसह 26, धवन 22 चेंडूत 4 चौकारांसह 23, हेन्रिकेस 10 चेंडूत 2 चौकारांसह 13, युवराज सिंग 16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 26, हुडा 7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 13, कटिंग 10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 15, नमन ओझा 11 चेंडूत नाबाद 11, बी. शर्मा 14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 21, अवांतर 7, वोक्स 2-49, पठाण 1-2, कुलदीप यादव 1-23, सुनील नारायण 1-18, बोल्ट 1-33).

 

 

धावफलक : कोलकता नाईट रायडर्स -सुनील नारायण त्रि.गो. भुवनेश्वर 6, गंभीर त्रि.गो. रशिद खान 15 (16 चेंडूत 2 चौकार), उथप्पा झे. रशिद खान गो. कटिंग 68 (39 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), मनीष पांडे झे. वॉर्नर गो. भुवनेश्वर 46 (35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), युसूफ पठाण नाबाद 21 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार यादव झे. ओझा गो. नेहरा 4, ग्रँडहोम त्रि.गो. भुवनेश्वर 0, वोक्स नाबाद 1, अवांतर 11, एकूण 20 षटकांत 6 बाद 172.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-10, 2-40, 3-117, 4-153, 5-163, 6-170.

गोलंदाजी-भुवनेश्वर 4-0-20-3, नेहरा 4-0-35-1, कटिंग 4-0-41-1, रशिद खान 4-0-29-1, हेन्रिकेस 2-0-26-0, बिपुल शर्मा 2-0-20-0.

सनरायजर्स हैदराबाद -वॉर्नर झे. वोक्स गो. कुलदीप यादव 26 (30 चेंडूत 4 चौकार), शिखर धवन झे. ग्रँडहोम गो. पठाण 23 (22 चेंडूत 4 चौकार), हेन्रिकेस झे. व गो. वोक्स 13 (10 चेंडूत 2 चौकार), युवराज सिंग झे. बदली आर.धवन गो. वोक्स 26 (16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), दीपक हुडा यष्टिचीत गो. नारायण 13 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कटिंग झे. ग्रँडहोम गो. बोल्ट 15 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), नमन ओझा नाबाद 11 (11 चेंडू), बुपल शर्मा नाबाद 21 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 7, एकूण 20 षटकांत 6 बाद 155.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-46, 2-59, 3-65ण् 4-96, 5-112, 6-129.ं

गोलंदाजी-वोक्स 4-0-49-2, पठाण 1-0-2-1, कुलदीप यादव 4-0-23-1, सुनील नारायण 4-0-18-1, बोल्ट 4-0-33-1, उमेद यादव 3-0-27-0.