|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा सहकार भांडाराच्या छताचा भाग कोसळला

गोवा सहकार भांडाराच्या छताचा भाग कोसळला 

प्रतिनिधी/ वास्को

वास्को शहरातील सहकार भांडारमधील छप्पराच्या सिमेंट काँक्रिटचा काही भाग कोसळल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे विशेष नुकसान झालेले नाही. मात्र, ही इमारत कमकुवत बनल्याचे पुन्हा उघड झालेले आहे. मागच्या पंचवीस वर्षांपासून या इमारतीला गळती लागलेली आहे.

 वास्को शहरातील गोवा सहकार भांडार मुरगाव पालिकेच्या मालकीच्या इमारतीत शहराच्या मध्यवर्ती भागात असून ही इमारत साधारण पन्नास वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झालेले असून या इमारतीच्या छताला मागच्या पंचवीस वर्षांपासून गळती लागलेली आहे. दर पावसाळय़ात सहकार भांडारातील कर्मचाऱयांना तसेच ग्राहकांनाही या गळतीचा सामना करावा लागतो. छताच्या सिमेंट काँक्रीटचे तुकडे खाली पडण्याच्या घटना छत कमकुवत झाल्याने वारंवार घडत असतात. या छताच्या स्लॅबचा काही भाग पुन्हा कोसळण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना काल शनिवारी सकाळी सहकार भाडांर उघडताच उघडकीस आली. त्यामुळे ही घटना रात्री किंवा पहाटे घडली असण्याची शक्यता आहे.

  सर्वत्र विखूरलेला सिमेंटचा थर काढून व साफसफाई करून कर्मचाऱयांनी आपल्या कामकाजाला सुरवात केली. मात्र, सहकार भांडार हा बाजार असल्याने रोज मोठय़ा संख्येने ग्राहक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ग्राहकांवर दुखापतीचा प्रसंग येऊ नये यासाठी या इमारतीच्या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Related posts: